हुवाईचे दोन नवे स्मार्टफोन लाँच

huwaie
मुंबई – ‘हॉली २ फ्लस’ व ‘हॉनर ५ एक्स’ हे दोन स्मार्टफोन हुवाई स्मार्टफोन ई-ब्रँड ‘हॉनर’ने बाजारात आणले असून हॉली २ फ्लस स्मार्टफोन सीडीएमए व डब्ल्यूसीडीएमए या दोन्हीलाही चालणार आहे. ४ जी, ३ जी व २ जी, एलटीए व सीडीएमएला सपोर्ट करतो. याची बॅटरी ४००० एमएएच असून, यात डय़ूअल माईक नॉइज कॅन्सलेशन टेक्नॉलॉजी, उत्कृष्ट ध्वनियंत्रणेची सोय देण्यात आली आहे. स्मार्टपॉवर ३.० वैशिष्टय़ामुळे ३०टक्के ऊर्जा वाचते व फोन अधिक काळ वापरता येतो. १३ मेगाफिक्सल रिअल व ५ मेगाफिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. १६ जीबी इनबिल्ट मेमरी असून, १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनची किंमत ८४९९ रूपये आहे. हॉनर ५ एक्स डय़ुअल सिम फोन असून, ०.५ सेकंद अनलॉक सुविधा आहे. रिम फ्री टच, फिंगरप्रिंट सेन्सॉर, मायक्रो सिम व मायक्रो एसडी कार्डची वैशिष्टय़े आहेत.

Leave a Comment