गुरू या ग्रहाशी मिळत्याजुळत्या पाच नवीनग्रहांचा शोध

guru
वॉशिंग्टन – वैज्ञानिकांनी आपल्या सौरमालेतील गुरू या ग्रहाशी मिळतेजुळते गुणधर्म असलेले पाच नवीन ग्रह शोधून काढले असून आपल्या सौरमालेतील गुरू हा मोठा ग्रह आहे. त्यांच्या मातृताऱ्याभोवती हे ग्रहसुद्धा फिरत असून तेही गुरूसारख्याच आकारमानाचे आहेत. ‘वास्प साऊथ’ म्हणजे वाइड अँगल फॉर प्लॅनेटस-साऊथ या उपकरणाचा वापर ब्रिटनमधील किली विद्यापीठातील वैज्ञानिकांनी यात केला असून या यंत्रणेत आठ कॅमेरे आहेत. त्यात दक्षिणेकडील ठरावीक भागाचे निरीक्षण करण्यात आले असता पाच ताऱ्यांभोवती प्रकाशाचा वक्राकार दिसला; प्रत्यक्षात ते या ग्रहांचे अधिक्रमण होते. नव्याने शोधलेल्या ग्रहांची नावे वास्प ११९ बी, वास्प १२४ बी, वास्प १२६ बी, वास्प १२९ बी, वास्प १३३ बी अशी आहेत, असे ‘फिजिक्स डॉट ओआरजी’ या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

या ग्रहांचा कक्षीय काळ हा २.१७ ते ५.७५ दिवस असून त्यांचे वस्तुमान गुरूच्या ०.३ ते १.२ पट आहे. तर त्रिज्या गुरूच्या त्रिज्येपेक्षा १ ते १.५ पटींनी अधिक आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. वास्प ११९ बी हा ग्रह गुरूच्या १.२ पट वस्तुमानाचा असून त्याचा कक्षीय काळ गुरूसारखा म्हणजे २.५ दिवस आहे. हे ग्रह ज्या ताऱ्याभोवती फिरत आहेत तो तारा तप्त असून त्याचे वस्तुमान सूर्याइतके आहे पण तो जुना तारा आहे कारण त्यांचे तपमान व घनता वेगळी आहे. वास्प १२४ बी हा ग्रह गुरू पेक्षा वस्तुमानाने ०.६ पट कमी असून त्याचा कक्षीय काळ ३.४ दिवस आहे, त्याचा मातृतारा तरूण आहे. वास्प १२६ बी हा ग्रह कमी वस्तुमानाचा आहे.

Leave a Comment