
जगातला सर्वाधिक म्हणजे अवघ्या २५१ रूपयांत स्मार्टफोन सादर करणार्या रिंगिग बेल कंपनीने लवकरच बेल सिम व नेटवर्कही उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे या फोनचे बुकींग सुरू झाल्यानंतर दोन वेळा वेबसाईट क्रॅश झाली, अनेकांचे बुकींग होऊ शकले नाही तर या फोनच्या किमतीवरून अन्य मोबाईल कंपन्यांनी आक्षेप व्यक्त करून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी टेलिकॉममंत्री रवीप्रसाद शंकर यांच्याकडे केली. इतके सारे वादविवाद होऊनही या फोनसाठी ५ कोटी लोकांनी बुकींग केले असल्याचेही सांगितले जात आहे.
रिंगिगबेलचे फ्रिडम पाठोपाठ स्वस्त सिम व नेटही
ही कंपनी आता स्वस्तात स्वस्त सिम व नेटवर्कही देणार असल्याच्या बातमीने ग्राहकांची उत्सुकता वाढीस लागली आहे. या कंपनीचा स्मार्टफोनच जर इतका स्वस्त आहे तर बेल्स सिम कार्ड व नेट किती कमी किमतीत मिळू शकेल याच्या अटकळी बांधल्या जाऊ लागल्या आहेत.
