१४व्या अपत्याला जन्म देऊन बनविला विश्वविक्रम

birth
वाशिंग्टन : एका ३६ वर्षीय महिलेने मंगळवारी अमेरिकेच्या डेट्रॉयटमध्ये आपल्या १४व्या अपत्याला जन्म देऊन एक वेगळाच विश्वविक्रम बनविला आहे. १४ वेगवेगळ्या पुरूषांसोबत या अनोख्या रेकॉर्डसाठी महिलेने संबंध ठेवले होते. त्यामुळे या रेकॉर्डसाठी विशेष महत्त्व मानले जात आहे.

रेकॉर्ड बनविणा-या महिलेचे नाव अनीता सुलिवान असे असून २०१७च्या गिनीज बुकच्या एडिशनमध्ये हा रेकॉर्ड नोंदविण्यात येणार आहे. तिची आई तिला आळशी म्हणून हिणवत होती. त्यामुळे काही वेगळे करायचे ठरवून मी हे पाऊल उचलले. या रेकॉर्डमुळे मला स्वतःला अभिमान वाटत असल्याचे अनीताने स्पष्ट केले.

१४व्या अपत्याच्या जन्मानंतर तिचे बाकीचे १३ मुलेही हार्पर यूनिवर्सिटीच्या रूग्णालयात भेटायला आले होते. ते सर्वजण या विक्रमामुळे आनंदीत आहेत. अनीता म्हणाली, मुलांच्या वडीलांना निवडण्यात खूप चूक केली आहे. सगळ्यांनी मला त्रास दिला आहे. मात्र, माझा नवीन पार्टनर रेमॉन मेरे हा चांगला असून, आम्ही अडीच वर्षापासून एकत्रित राहत आहोत. अनीताला सोडलेल्या १३ पार्टनरपैकी ११ जणांकडून पेंशन मिळत आहे. बाकी दोघांच्या पेंशनसाठी न्यायालयात केस चालू असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment