शिरा खायला घालून झाली अर्थसंकल्प छपाईची सुरवात

halwa
दिल्ली- यंदाच्या वर्षाचे म्हणजे २०१६-१७ सालचे बजेट अर्थमंत्री अरूण जेटली संसदेत मांडणार आहेत. त्या अर्थसंकल्पाच्या छपाईची सुरवात परंपरेनुसार शिरा वाटपाने झाली. अर्थमंत्री जेटली यांनी नॉर्थ ब्लॉक ऑफिसमध्ये अर्थ मंत्रालयाच्या कर्मचार्‍यांना शिरा वाटप केले.

गेल्या अनेक वर्षाच्या प्रथेनुसार अर्थसंकल्पाच्या छपाईची सुरवात करण्यापूर्वी शिरा केला जातो. मोठ्या कढईत अर्थमंत्र्यांच्या हस्ते प्रथम तूप घातले जाते व शिरा बनविण्याच्या कृतीची सुरवात त्यांच्याच हस्ते केली जाते. त्यानंतर शिरा तयार करण्याची बाकी कृती शेफ करतात व हा शिरा अर्थमंत्री स्वतःच्या हाताने आपल्या मंत्रालयाच्या कर्मचार्‍यांना खिलवतात. या कार्यक्रमाला अर्थ खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हा, वित्त सचिव, महसूल सचिव व अर्थसंकल्पाशी संबंधित अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment