एफ १६ विमानांचे भारतात उत्पादन करण्याची तयारी

f16
अमेरिकन लढावू विमाने एफ १६ चे मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन करण्याची तयारी लॉकहीड मार्टिन कंपनीने दर्शविली आहे. सिंगापूर येथे पार पडलेल्या एअरशो मध्ये पत्रकारांशी बोलताना लॉकहीड मार्टिन इंडिया प्रा.लिमि.चे मुख्य अधिकारी फिल शॉ यांनी ही माहिती दिली.

शॉ म्हणाले मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत दोन्ही देशात उत्पादन प्रकल्पांसंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याचे आम्ही समर्थन करतो. एफ सोळा विमाने भारतात उत्पादन करण्याची आमची तयारी असून या उपक्रमाअंतर्गत होत असलेल्या योजनेतील ही सर्वात मोठी योजना असू शकते. या प्रकल्प किती काळात उभारला जाईल याविषयी मात्र त्यांनी माहिती दिली नाही.

कंपनीच्या अमेरिकन प्लँटमध्ये महिन्याला १ जेट विमान बनविले जाते. लॉकहिड मार्टिनने भारताला ६ सुपर हक्र्यूलस सी १३० ही मालवाहू विमाने दिली आहेत आणि पुढच्या वर्षी सहा हेलिकॉप्टर्सही दिली जाणार आहेत.