आत्यंतिक दारिद्य्र

poor
भारताचे वर्णन जगात फार वेगळ्या शब्दात केले जात होते. इंडिया इज अ रिच कंट्री बट पुअर पीपल लीव्हा इन इट. म्हणजे भारत देश संपन्न आहे पण त्यात गरीब लोक राहतात. याचा अर्थ असा की या देशाला निसर्गाने खूप काही दिले आहे पण त्याचा वापर नीट केला जात नसल्याने या देशातले लोक गरीब आहेत. भारताच्या या वर्णनाला या देशातले ओडिशा हे राज्य पूर्णपणे पात्र आहे. निसर्ग संपन्न असूनही एखादा भाग कसा गरीब रहातो हे आपल्याला ओडिशात बघायला मिळते. कारण ते सर्वात संपन्न असून देशातले सर्वात गरीब राज्य आहे. २६ जानेवारीला ओडिशातल्या केंओझार जिल्ह्यात एक महिलेने पतीच्या अंत्यविधीचा खर्च भागवता यावा म्हणून दोन मुलांना गहाण ठेवले आणि त्यातून आलेल्या पैशातून पतीचा अंत्यविधी केला.

भारत देश कृषि प्रधान आहे आणि शेतीला लागणारा पाऊस ओडिशात भरपूर पडतो. ओरिसातली पावसाची सरासरी १०० इंच आहे पण शेती केली तरच पावसातून समृद्धी येईल. ओडिशातले केओंझार, बोलांगीर आणि कलाहंडी हे देशातले सर्वात दरिद्री जिल्हे आहेत. या तीन जिल्ह्यांचा विकास करून त्यांना या गरिबीच्या अरिष्टातून मुक्त करण्यासाठी एक स्वतंत्र योजना आखण्यात आली होती. पण तिच्यासाठी दिलेला पैसा कोठे गेला याचा काही पत्ता लागला नाही. भरपूर पैसा खर्च करूनही हे तीन जिल्हे होते तिथेच आहेत.

राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ इकानॉमिक्स या संस्थेने तर भारतातल्या सर्वात मागासलेल्या १०० जिल्ह्यांची यादी केली असून त्यात ओरिसातल्या या तीनच नाही तर सर्व २१ जिल्ह्यांचा समावेश केला होता. आता ही जिल्ह्यांची संख्या ३० वर गेली आहे पण सारा ओरिसाच या यादीत आहे. असे का होते? भारतात गरिबी नाही असे कोणी म्हणणार नाही पण निदान आता आपल्या देशाची अतीदारिद्य्रातून बर्‍यापैकी सुटका झाली आहे. खायला मिळत नाही म्हणून माणसे मरतात असे आता या देशात कोठेच दिसत नाही. पण आपल्या देशातले ते दारिद्य्र ओरिसात दिसते. केवळ ओरिसाच नाही तर प. बंगाल, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, बिहार याही राज्यात अजून दारिद्य्र आहे. यातल्या प. बंगालात तर डाव्या आघाडीने तब्बल ३५ वर्षे राज्य केले आहे पण या आघाडीला या साडे तीन दशकात राज्यातल्या गरिबीवर काही उपाय योजिता आला नाही. या राज्यांवर खास काही तरी केले गेले पाहिजे.

Leave a Comment