फ्रीडमने केला ग्राहकांचा पोपट; वेबसाईट पहिल्याच दिवशी क्रॅश

freedom-1
मुंबई – जगातील सर्वात स्वस्त मोबाईल देणाऱ्या फ्रीडम २५१ या स्मार्टफोनची बुकिंग सुरू झाली खरी पण बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा चांगलाच पोपट झाला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून कंपनीने http://www.freedom251.com/ या वेबसाईटवरुन बुकिंग सुरु होणार होती. मात्र जशी बुकिंगची वेळ आली तशी वेबसाईट क्रॅश झाली. इतकेच नव्हे तर फ्रीडम २५१ ट्विटरवरही ट्रेड करु लागला.

२१ फेब्रुवारी रात्री आठ वाजेपर्यंत या स्मार्टफोनसाठीची बुकिंग कालावधी देण्यात आला आहे. इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन मिळत असल्याने बुकिंगच्या वेळेस एकाचवेळी मोठ्या संख्येने ग्राहकांनी वेबसाईटला लॉग इन केले.

रिंगिग बेल्स या कंपनीचा हा स्मार्टफोन आहे. २५१ रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये १.३ गिगाहर्टझ क्वाड कोर प्रोसेसर देण्यात आलाय. तसेच एक जीबी रॅम आणि आठ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. यात ३.२ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर ०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment