जगातील सर्वात मोठा स्कूटर कारखाना गुजराथेत सुरू

honda
अहमदाबाद- होंडा स्कूटरचा जगातील सर्वात मोठा कारखाना अहमदाबादजवळच्या विठ्ठलपूर येथे सुरू झाला असून त्याचे उद्घाटन गुजराथच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी या कारखान्यात तयार झालेली पहिली स्कूटर आनंदीबेन यांना भेट म्हणून देण्यात आली. आनंदीबेन यांनी यावेळी बोलताना ही स्कूटर मेडिकलचे शिक्षण घेण्याची तयारी करत असलेल्या वंचित समाजातील मुलीला देणार असल्याचे जाहीर केले.

या कारखान्यातून दरवर्षी १२ लाख स्कूटरचे उत्पादन केले जाणार आहे. त्यासाठी ११०० कोटींची गुंतवणूक केली गेली असून ३ हजार लोकांना येथे रोजगार मिळाला आहे. या कारखान्याचे भूमिपूजन झाल्यानंतर अवघ्या १५ महिन्यात येथे उत्पादन सुरू करण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. या कारखान्यामुळे आसपासच्या भागातील अन्य विकासकामांनाही गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment