ट्विटरने दाखवले पाकमध्ये जम्मू

twitter
नवी दिल्ली – भारताचा विकृत नकाशा ट्विटर या लोकप्रिय समाज माध्यमाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या नकाशात जम्मूचा समावेश पाकिस्तानात करण्यात आला आहे. तर उर्वरित जम्मू-काश्मीर चीनमध्ये दाखविण्यात आला आहे. यासंदर्भात ट्विटरकडे अनेक नेटीझन्सनी तक्रारी दाखल केल्या असून नकाशा काढून घेण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत अनेकदा अनेक समाजमाध्यमांवरून भारताचा नकाशा चुकीचा दाखविण्यात आला आहे. पण जम्मूचा समावेश पाकिस्तानात करण्याची चूक प्रथमच घडली आहे, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment