कॅन्सरचा धोका आंबे खाल्ल्याने टळणार?

mango
मुंबई : तुम्हाला तुमच्या आजूबाजूला बरेच आंबा प्रेमी दिसतील. कदाचित त्यापैकी तुम्ही देखील एक असाल. पण जर का तुम्हाला असे समजले आंबे खाल्ल्याने कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो तर?

कॅन्सरचा धोका आंब्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्समुळे टाळता येऊ शकतो. कॅन्सरविरोधी पेशींना व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन, गॅलिक अॅसिड आणि गॅलोटॅनिन्ससारख्या घटकांमुळे बळ असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे.

हे संशोधन जर्नल ऑफ मोलेक्युलर न्यूट्रिशन अँड फूड रिसर्चमध्ये प्रसिद्ध झाले असून वय वर्ष २१ ते ३८ मधील ११ निरोगी व्यक्तींना दहा दिवस दररोज ४०० ग्रॅम आंब्याचा पल्प देण्यात आला. त्यानंतर दररोज त्यांचे रक्त आणि युरिनचे नमुने तपासण्यात आले. संशोधनाच्या आठवडाभर आधीपासून बेरी, द्राक्ष, चहा यासारख्या पदार्थांपासून दूर ठेवण्यात आले होते. सहभागी व्यक्तींच्या रक्त आणि युरिनच्या नमुन्यातून त्यांच्या शरीरात कॅन्सरच्या पेशींशी लढा देणारे घटक वाढीला लागल्याचे निष्पन्न झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment