
मुंबई: आपला नवा स्मार्टफोन आयफोन ६एससाठी अॅपलने एक खास ऑफर आणली असून तब्बल ९००० पर्यंत यामध्ये एक्सचेंज ऑफर मिळू शकते. अॅपलने आयफोन ६एसचा खप वाढविण्यासाठी यासाठी ईएमआय ऑफरही सुरु केली आहे. ही ऑफर २६ मार्चपर्यंतच लागू आहे. मात्र, ही एक्सचेंज ऑफर काही स्मार्टफोन पुरतीच लागू आहे. कोणकोणते स्मार्टफोन स्वीकारले जातील याची यादीही देण्यात आली आहे.
