मुस्लिम विद्यार्थिनीला रामायण परीक्षेत मिळाले ९३ टक्के

ramayan
मंगळूर (कर्नाटक)- मुस्लिम विद्यार्थिनी फातिमा रहिला हिने भारत संस्कृती प्रतिष्ठानने रामायण या विषयावर घेतलेल्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

फातिमा ही कर्नाटक-केरळ सीमेवर असलेल्या सुल्लीआपदावू येथील सर्वोदया विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत असून रामायण व महाभारताचा तिने अभ्यास केला आहे. तिला परिक्षेसाठी तिच्या काकांची मोठी मदत झाली आहे. पुढे ती महाभारताची परीक्षा देणार असून, यामध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा तिचा मानस आहे, अशी माहिती तिचे वडील इब्राहिम यांनी दिली. विद्यालयाचे प्राचार्य एच. डी. शिवरामा यांनी सांगितले की, भारत संस्कृती प्रतिष्ठानने नोव्हेंबर २०१५ मध्ये रामायण या विषयावर परीक्षा घेतली होती. परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत फातिमाने प्रथम क्रमांक मिळविला आहे.