…आणि भारत फ्री बेसिक्समुक्त झाला

facebook
नवी दिल्ली – दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने कौल दिल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात फेसबुकने भारतातून फ्री बेसिक्सचा बाजार गुंडाळला आहे. ईमेल स्टेटमेंटमध्ये भारतामध्ये प्री बेसिक आता उपलब्ध नाही असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

रिलायन्सने ट्रायच्या आदेशानंतर फेसबुकचा फ्री बेसिक्स प्लॅटफॉर्म स:शुल्क (पेड) करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच सगळ्या ग्राहकांना ट्रायच्या आदेशानुसार त्यांना हवी ती माहिती मिळवण्याचा व त्यासाठी समान पैसे मोजण्याचा निर्णय अमलात आला आहे. फ्री बेसिक्समध्ये सेवा देणा-या कंपन्या त्यांना हवी असलेली माहिती ग्राहकाच्या गळ्यात मारू शकतील अशी शंका उपस्थित होत होती. तसेच, इंटरनेट हे माध्यम सगळ्यांसाठी समान असावे त्यात भेदभाव असून नये हा विचार होता. ट्रायने हा विचार मान्य करत नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने कौल दिला आणि फेसबुकच्या फ्री बेसिक्सच्या योजनेला छेद दिला आहे.

भारतामध्ये रिलायन्स कम्युनिकेशन्स फेसबुकच्या फ्री बेसिक्सची एकमेव वितरक होती. त्यामुळे रिलायन्सनेच फ्री बेसिक्स पेड करण्याचा निर्णय घेतला आणि फेसबुकने भारतात फ्री बेसिक्स बंद करण्याचा निर्णय घेतला आणि भारत फ्री बेसिक्समुक्त झाला.

Leave a Comment