खरा ठरला आईनस्टाईन यांचा दावा; गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध

albert-einstine
मुंबई : भौतिकशास्त्रज्ञांनी अंतराळातील गुरुत्वाकर्षण लहरींचा शोध लावल्याची घोषणा केल्यामुळे आधुनिक विज्ञानातील एक मैलाचा दगड हा शोध ठरू शकतो. या अगोदर आपल्या सापेक्षवादाच्या सिद्धांतात या लहरींबाबत अल्बर्ट आईनस्टाईन यांनी भाकित केले होते. त्यानंतर प्रथमच या लहरींचा शोध लागल्याने त्यांचे हे भाकित खरे ठरले आहे, असे म्हणता येईल. भारतीय शास्त्रज्ञांचे या लहरींचा शोध लावण्यात योगदान मोठे आहे.

अमेरिकेतील लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरीच्या दोन वेधशाळा आणि इटलीमधील व्हर्गो वेधशाळा यांनी संयुक्तपणे गुरुत्वीय लहरींची प्रत्यक्ष नोंद घेण्यासाठी प्रयोग केले होते. या शोधाबद्दल आता जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यासंदर्भात खगोलशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांनी हा एक मोठा शोध असल्याचे फेसबुक पेजवर म्हटले आहे. या लहरींचा शोध लावण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणा-या सर्व भारतीय शास्त्रज्ञांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Comment