शेअर बाजार गडगडला; ३.१३ लाख कोटींचे नुकसान

share-bajar
मुंबई- गुरुवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स तब्बल ८०७ अंकांनी तर निफ्टी २३९ अंकांनी खाली घरसला. सेन्सेक्समधील या घसरणीमुळे ३० बड्या कंपन्यांचे बाजारमूल्य ३.१३ लाख कोटींनी कमी झाले आहे. बीएसईच्या ३० शेअर कंपन्यांचा प्रमुख इंडेक्स सेंसेक्स ८०७ अंकांनी खाली घसरून, तो २२९५१ या पातळीवर आला आहे. तर निफ्टीच्या ५० शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी २०० अंकांनी खाली येत ७००० हजारांच्या खाली आला आहे. १२ मे २०१४ नंतर प्रथमच निफ्टी प्रथमच ७००० हजारांच्या खाली आल्याने बाजारात खळबळ माजली आहे. निफ्टीतील ५० पैकी तब्बल ४५ कंपन्यांचे शेअर खाली आले आहेत. यात वेदांता, बीएचईएल, ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर तब्बल ५ टक्क्यांनी खाली आहेत.

Leave a Comment