गोदरेजची सुरू झाली ‘सर्व्हिस व्हॅन’ सेवा

godrej
पुणे – ‘स्मार्ट मोबाईल सर्व्हिस व्हॅन’ ही उपकरण क्षेत्रातील पहिलीवहिली सेवा गोदरेज अप्लायन्सेस या देशातील एका आघाडीच्या होम अप्लायन्सेस ब्रँडने सुरू केली आहे. याअंतर्गत नियमित देखभाल, इन्स्टॉलेशन, उत्पादनाचे प्रात्यक्षिक आदी सेवा दिल्या जाणार आहेत.

स्मार्ट मोबाईल ही ब्रँडेड सर्व्हिस व्हॅन असून, त्यात दर्जेदार प्रोफेशनल सेवा देण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांचा समावेश आहे. यात जनरेटरचीही व्यवस्था असून, ग्राहकांना सोयीच्या वेळी सेवा मिळेल. देशभरात ९० ब्रँडेड व्हॅन्स दाखल केल्या असून, चालू आर्थिक वर्षाअखेरीस ही संख्या ७५ पर्यंत जाईल. तर पुढील वर्षी २०० पर्यंत नेण्यात येईल, असे बिझनेस प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी व राष्ट्रीय सेवा प्रमुख रवी भट यांनी सांगितले.

Leave a Comment