आता ऑनलाईन मिळणार जगभर मागणी असलेल्या धारावीच्या वस्तू

dharavi
मुंबई : आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहेच. पण धारावी हे मुंबईतले अनौपचारीक आणि खास इकॉनॉमिक झोन आहे. तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वस्तु कशी ना कशी धारावीशी संबंधित आहेच.

आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर dharavimarket.com या नावाने धारावी ओळखली जात आहे. स्नॅपडील, फ्लिपकार्ट, जबाँग, ऍमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्ही धारावीत तयार होणारी प्रत्येक वस्तु खरेदी करू शकता. चार महिन्यांपूर्वी मेघा गुप्ताने ही वेबसाईट सुरू केली असून या वेबसाईटवर ३०० कुशल कामगारांनी नोंदणी केली आहे. हे कारागीर सोशल नेटवर्किंग साईट व्हाटसअॅपचा वापर करत असल्याने मेघाला या सर्वांना सोबत घेणे खूप सोपे झाले. लवकरच धारावीतल्या सर्व प्रोडक्ट्सना नवे नाव दिले जाणार आहे. हे प्रोडक्टस् धामा या नावाखाली विकले जातील.

चामड्याच्या वस्तु, मातीची भांडी, मातीच्या शोभेच्या वस्तु, दागदागिने, चामड्याच्या इतर वस्तु, धारावीतले कारागीर आता मुंबईतच नाही तर जगभरात विकू शकतात. मेघा सोशल कॅपिट क्रेडिट प्रोग्रामही चालवते. धारावीच्या कारागिरांनी त्यांच्याकडे कुठल्या महिलेला रोजगार देत असेल किंवा मॅन्यूफॅक्चरिंग युनिटमध्ये स्वच्छता ठेवत असेल तर त्या कारागिरांना पॉईंट्स दिले जातात. ते पॉईंटसच्या बदल्यात कारागिरांना मोबाईल रिचार्ज करून दिला जातो किंवा नेट पॅकही दिला जातो.

Leave a Comment