आईस्क्रीम होणार कडवट

ice-crame
मुंबई : लहानथोर सर्वांच्या आवडीचे आणि जीवाला गारेगार करणारे आईस्क्रीम महाग होण्याची चिन्ह असल्यामुळे आईस्क्रीमची चव कडवट होणार आहे.

आईस्क्रीमची दरवाढ येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याचे संकेत मिळत असून आईस्क्रीम तसेच इतर पदार्थांवरच्या एक्साईज ड्युटीवर दिलेली सूट कमी करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहेत. त्यामुळे तुमच्या आमच्या पसंतीचे आईस्क्रीम महाग होऊ शकते. गूड्स अँड सर्व्हीस टॅक्स म्हणजेच जीएसटीकरिता, एक्साईज ड्यूटीमध्ये सूट दिलेल्या वस्तूंवर कर आकारण्याचा सरकारचा विचार असल्यामुळे जीवाला गारेगार करणारे आईस्क्रीम, यापुढे खिशाला मात्र चटका देणारे ठरु शकते.

Leave a Comment