काही सेकंदात ० ते १०० किमीचा वेग धरणार ‘पोलो जीटीआय’

polo
नवी दिल्ली : आपल्या ‘पोलो’ श्रेणीतील ‘पोलो जीटीआय’ हे नवे मॉडेल दिल्लीत सुरू असलेल्या ‘ऑटो एस्क्पो २०१६’मध्ये अलिशान मोटार निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘फोक्सवॅगन’ने सादर केले असून पोलो जीटीआय पॉवर आणि परफॉर्मंसच्या बाबतीत अन्य हॅचबॅक मोटारींच्या तुलनेत सरस असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

या मॉडेलमध्ये टर्बोचार्ज्ड १.८ पेट्रोल इंजिनचा समोवश असून, ते १९२ बीएचपी पॉवर जनरेट करते. या मोटारीला तीन दरवाजे देण्यात आले आहेत. मात्र, लवकरच पोलो जीटीआयचे आणखी एक नवीन मॉडेल सादर करण्यात येणार असून, त्यात पाच दरवाजे देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

शार्प एलईडी हेडलॅम्प, बोल्ड हनीकांब ग्रील्स, स्पोर्टी लुक्सचे बुम्पर्स, हॉरिझॉन्टल फोग लॅम्पस्, आणि अलाइव्ह व्हिल्सचा पोलो जीटीआयमध्ये समावेश करण्यात आला असून या मोटारीचे टॉप स्पीड ताशी २५० किलोमीटर असून, ही मोटार अवघ्या ६ सेकंदात ० ते १०० किलीमीटरचा वेग पकडू शकते असा दावा फोक्सवॅगन कंपनीने केला आहे.

Leave a Comment