२१ भाषांचा समावेश असलेला पॅनासॉनिकचा नवा स्मार्टफोन!

panasonic
मुंबई : पी ६६ मेगा हा नवा कोरा स्मार्टफोन भारतीय बाजारात पॅनासॉनिक कंपनीने लॉन्च केला असून या स्मार्टफोनची किंमत ७ हजार ९९० रुपये आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे २१ भाषांना हा स्मार्टफोन सपोर्ट करतो.

यात अँड्रॉईडची ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉईडचे लेटेस्ट ५.१ लॉलिपॉप ओएस मिळणार आहे. याचा डिस्प्ले ५ इंचाचा असून १.३ GHz क्वाड-कोर ६४-बिट प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय २ जीबी क्षमतेचे रॅम देखील देण्यात आले आहेत. याची इंटरनल स्टोरेज १६ जीबी असून मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने ३२ जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा आहे.एलईडी फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हटीमध्ये ३जी, ब्‍लूटूथ, वाय-फाय आणि जीपीएस इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. ३२००mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून इलेक्ट्रिक ब्ल्यू, रोज गोल्ड आणि रसेट ब्राऊन या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. पी ६६ मेगा या स्मार्टफोनला स्टायलिश बनवण्याचा प्रयत्न पॅनासॉनिकने केला आहे. स्मार्टफोनचा लूक आकर्षक बनवण्याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.

Leave a Comment