मिनिटांत ८२ पुश अप्स मारून नोंदविला जागतिक विक्रम

kj-joseph
कोची – एका मिनिटांत ८२ पुश अप्स मारून केरळमधील मुन्नार येथे के. जे. जोसेफ यांनी जागतिक विक्रम नोंदविला आहे.

यापूर्वी अमेरिकेच्या रॉन कपूर यांच्या नावावर असलेल्या ७९ पुश अप्सचा विक्रम जोसेफ यांनी ८२ पुश अप्स मारुन मोडीत काढला. गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली असली तरी अद्याप याची अधिकृतरित्या नोंद झालेली नाही. प्रत्येक सेकंदाला त्यांनी सरासरी १.३५ पुश अप्स मारत हा विक्रम केला.

जोसेफ हे शाकाहारी असून, ते जिममध्ये जात नाहीत. त्यांनी मार्शल आर्टचे शिक्षण घेतले आहे. आता एका मिनिटांत ९० पुश अप्स मारण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. यापूर्वी एका तासात २०९२ पुश अप्स मारुन जोसेफ यांनी युनिव्हर्सल रेकॉर्डमध्ये नाव नोंदविलेले आहे.

Leave a Comment