लेईकोने रचला नवा इतिहास; २० सेकंदात विकले ९५ हजार हॅंडसेट

leco
मुंबई – फ्लॅश सेलद्वारा अवघ्या २० सेकंदात चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी लेईकोने १०,९९९ रुपये किमतीचा ले१ एसचे ९५ हजार हँडसेट्‍स विकले आहेत. मंगळवारी ई-कॉमर्स वेबसाइट ‘फ्लिपकार्ट’ वर फ्लॅश सेलद्वारा १० लाख ३० हजार ग्राहकांनी ले १ एस स्मार्टफोनसाठी रजिस्ट्रेशन केले होते.

आतापर्यंत झालेल्या फ्लॅश सेलमध्ये कोणत्याही कंपनीच्या स्मार्टफोनला इतका प्रतिसाद मिळाला नाही. अल्पावधीतच या कंपनीने जास्त ऑर्डर मिळवल्या आहेत. पहिल्या फ्लॅश सेलमध्ये अवघ्या २ सेकंदात ७० हजार हँडसेट विकले होते. कंपनीने आपल्या बहुचर्चित स्मार्टफोनसाठी गेल्या आठवड्यात फ्लॅश सेल ठेवला होते. यात ७० हजारहून हँडसेट विक्री झाले होते. तीन महिन्यांपूर्वी कंपनीने चीनमध्ये ले१ एसचे ३० लाखांहून जास्त हॅंडसेट विकले होते. येत्या १६ फेब्रुवारीला ‘फ्लिपकार्ट’वर कंपनीने पुन्हा फ्लॅश सेल आयोजित केला आहे.

Leave a Comment