सोन्यासारखा पैसा सोन्यातच गुंतवा

gold
दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्टॉक मार्केट मध्ये उलथापालथ होण्याची शक्यता अर्थतज्ञ वर्तवित आहेत व त्याचवेळी अनेक अर्थजाणकार गुंतवणुकदारांना सोन्यात पैसा गुंतविणे फायद्याचे ठरणार असल्याचेही सांगत आहेत. येत्या कांही दिवसांत सोन्याच्या किंमती दुप्पट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

सराफी क्षेत्रातील तज्ञ सुरेश केडिया यांच्या म्हणण्यानुसार सोन्याचे भाव आगामी काळात सध्यांच्या १ हजार डॉलर्स प्रती औसावरून २ हजार डॉलर्सवर जातील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सोने हा सुपर अॅसेट ठरणार आहे. अमेरिकन डॉलर अन्य चलनांच्या तुलनेत कमजोर पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर तेलांच्या घसरत्या किमती, चीनमधील मंदी, चीनी चलनाचे अवमूल्यन यामुळे सोन्याचे दर आत्ताच चढू लागले आहेत. लग्नसराई तोंडावर असल्याने सध्या तरी दर उतरण्याची अजिबात शक्यता नाही.

Leave a Comment