फेरारी स्पायडर स्काग्लेटीसाठी २२४ कोटींची बोली

spider
क्लासिक कारची मालकी आपल्याकडे असावी अशी अनेकांची इच्छा असते व त्यासाठी करोडो रूपये मोजायची त्यांची तयारीही असते. पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या एका लिलावात १९५७ फेरारी एस स्पायडर स्काग्येटीला ३२ दशलक्ष युरो म्हणजे २२४ कोटी रूपये किंमत मिळांल्याची बातमी आहे. ही किंमत ५० हजार रूपयांच्या ५० हजार मोटरबाईक इतकी आहे. यामुळे ही जगातली सर्वाधिक महागडी रेसिंग कार ठरली आहे.

रेसिंग कारसाठी सर्वाधिक किमतीचे मागचे रेकॉर्ड १९६२ फेरारी जीटीयूच्या नावावर असून २०१४ मध्ये या गाडीला २८.९ दशलक्ष युरो किंमत मिळाली होती. सध्याच्या या महागड्या फेरारीचा वापर १९५० च्या दशकात कांही ब्रिटीश रेसरनी केला होता. नंतर परत ती कारखान्यात नेऊन तिचे इंजिन ३.६ वरून ४.१ लिटर क्षमतेचे केले गेले. अपग्रेडेशन नंतर या कारचा टॉप स्पीड तासाला ३०० किमीवर पोहोचला. त्या काळातला हा सर्वाधिक वेग होता. ही कार खरेदी करणार्‍या ग्राहकाचे नांव जाहीर केले गेले नाही मात्र तो अमेरिकन असल्याचे सांगितले गेले आहे.

Leave a Comment