अॅसिड हल्ल्यातील पीडित फॅशन जगताची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर

viva-diva1
सुरत- कॅमेऱ्याच्या फ्लॅशला ती घाबरत असे कारण ही तसेच होते तिला तिचे कधीही भरुन न येणारे नुकसान त्यांनी केले होते. अॅसिड हल्ला करुन त्यांनी तिच्यापासून तिचा चेहराच कायमचा हिरावून नेला होता. काळ सर्व गोष्टीवरील औषध आहे असे म्हणतात तिलाही याची प्रचिती आली आहे.
viva-diva
आता विवा आणि दिवा या फॅशन जगतातील नामांकित ब्रँन्डसची अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेली आणि धैर्याचे मुर्तीमंत उदाहरण असलेली लक्ष्मी अॅम्बेसेडर झाली आहे. फेस ऑफ करेज या शिषर्काखाली त्यांनी लक्ष्मीला ब्रँन्ड अॅम्बेसेडर केले आहे. लक्ष्मी ही अॅसिड हल्ला पिडीतांसाठी नव्हे तर सर्व महिलांसाठीच एक आदर्श असल्याचे आणि समाजातील विघातक प्रवृत्तीविरोधात लढणाऱ्या प्रत्येकासाठीच हा फ्लॅटफॉर्म असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मोहिमेद्वारे लोकांचा फॅशनकडे बदलण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment