प्लेबॉयचे सेफ फॉर वर्क एडिशन सुरू

playboy
न्यूयॉर्क- आपली छायाचित्रे आणि अतिशय हॉट कंटेटसाठी गेली ६३ वर्षे प्रसिद्ध असलेल्या प्लेबॉय मॅगजिनने ऑक्टोबरमध्ये आपले रुप बदलयाचे आहे असा निर्णय घेतला होता. त्याला अनुसरुनच प्लेबॉयने त्यांचा पहिला अंक छापला आहे ज्यात नग्न स्त्रियांची चित्रे नाहीत. सेफ फॉर वर्क म्हणजे जेथे आपण काम करतो तेथे देखील तो अंक नेल्यास काही वावगं ठरणार नाही असे प्लेबॉयने म्हटलं आहे.

प्लेबॉयच्या कव्हरवर इन्स्टाग्राममुळे प्रसिद्ध झालेली मॉडेल साराह मॅकडॅनियल ही झळकली आहे. स्नॅपचॅटचा संदेश ‘heyyy 😉 या कव्हरवर लावण्यात आला आहे. बदलत्या काळाला समोर ठेऊन प्लेबॉयने आपले स्वरुप बदलण्याचा निर्णय घेतला होता. ठरवल्याप्रमाणेच त्यांनी हा अंक काढला आहे. तसेच, सोशल मिडियामुळे प्रसिद्धिस आलेली मॉडेल आणि स्नॅपचॅटचा मेसेज ठेऊन त्यांनी युवावर्ग विशेषतः इंटरनेटच्या आहारी गेलेल्या वर्गाला आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट यावरून दिसत आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्लेबॉयने त्यांची सेफ फॉर वर्क वेबसाइट प्लेबॉय डॉट कॉम सुरू केली होती तिची ट्राफिक चोपट वाढल्याचे त्यांनी सांगितले. इंटरनेट आणि फ्री पॉर्नच्या युगात तग धरुन राहणे मुश्कील झाल्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला.

Leave a Comment