भारतात सॅमसंगने लॉन्च केले २ नवे स्मार्टफोन्स

samsung
मुंबई – भारतात आपले दोन नवे फोन गॅलेक्सी ए५ आणि गॅलेक्सी ए७ स्मार्टफोन निर्माण करणा-या सॅमसंग कंपनीने भारतात लॉन्च केले आहेत. कंपनीने हे फोन मलेशियाची राजधानी क्वालालंपुरमध्ये सुरु असलेल्या एका इव्हेंटमध्ये लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी ए५ ची किंमत २९,४०० रुपये आहे तर गॅलेक्सी ए७ ची किंमत ३३,४०० रुपये आहे.

सॅमसंगने काही महिन्यांपुर्वीच आपल्या गॅलेक्सी ए५ आणि गॅलेक्सी ए७ या स्मार्टफोन्सची घोषणा केली होती. आता हे दोन्ही फोन्स भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. गॅलेक्सी सिरिजमधील या दोन्ही मॉडेल्सचे विविध फिचर्स एक सारखे आहेत. गॅलेक्सी ए५ चा डिस्प्ले ५.२ तर गॅलेक्सी ए७ चा डिस्प्ले ५.५ इंच आहे. गॅलेक्सी ए५ मध्ये २जीबी रॅम आणि २९०० मिलीअँम्पिअर क्षमतेची बॅटरी आहे, तर गॅलेक्सी ए७ मध्ये ३जीबी रॅम आणि ३३०० मिलीअँम्पिअर क्षमतेची बॅटरी आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये ऑक्टॉकोअर एक्झीनॉस प्रोसेसर दिलेला आहे. यासोबतच १३ आणि ५ मेगापिक्सल्स कॅमेरेही दिलेले आहेत. फोन्सची इनबिल्ट स्टोअरेज क्षमता १६जीबी असून ते १२८जीबी पर्यंत वाढविणे शक्य आहे.

Leave a Comment