महिला सशक्तीकरणासाठी वोडाफोनचे ‘अ‍ॅंजल स्टोर’

vodafone
हरियाणा: देशातील मोठ्या टेलिकम्युनिकेशन कंपन्यांपैकी एक असलेली वोडाफोन इंडियाने महिला सशक्तीकरणासाठी एक चांगले पाऊल उचलले आहे. असून वोडाफोनने अंबाला येथे ‘वोडाफोन अ‍ॅंजेल स्टोर’ची सुरूवात केली आहे. महिला सशक्तीकरणाकडे एक पाऊल म्हणून सुरू करण्यात आलेले हे स्टोर पूर्णपणे महिलांकडूनच चालवले आणि मॅनेज केले जाणार आहे.

हरियाणा सर्कलचे वोडाफोन इंडियाचे बिझनेस हेड मोहित नरू यांनी ‘वोडाफोन अ‍ॅंजेल स्टोर’चे उदघाटन केले. हे स्टोर १७२ बी, राय मार्केट, अंबाला कॅन्ट येथे सुरू करण्यात आले असून या स्टोरमध्ये फक्त महिला कर्मचारीच असणार आहेत. इतकेच नाहीतर या स्टोरची सिक्युरीटी, सफाई कामगार, ग्राहक सेवा कर्मचारी आणि मॅनेजमेंट बॉडीही महिला कर्मचा-यांचीच आहे.

यावेळी हरियाणा सर्कलचे बिझनेस हेड मोहित नरू म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातूनच समाजाचा विकास होऊ शकतो यावर आम्ही विश्वास ठेवतो. ह्या स्टोरच्या माध्यमातून आम्ही सर्वात सुरक्षित आणि प्रोडक्टीव्ह वातारवरण असलेले स्टोर सुरू केले आहे. वोडाफोन इंडियाने नेहमीच समान हक्क आणि संधीचे समर्थन केले आहे. त्यानुसार आमच्या महिला कर्मचा-यांना आम्ही अनेक संधीही दिल्या आहेत. त्यांचे करिअर उंचावण्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या आहेत. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही सुरू केलेल्या अ‍ॅंजल स्टोरच्या सर्व कर्मचारी त्यांच्या पूर्ण जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडतील आणि या स्टोरला वोडाफोनचं सर्वात चांगलं स्टोर बनवतील. या स्टोरनंतर अनेक ठिकाणी असे स्टोर सुरू करण्याचा आमचा विचार आहे.

Leave a Comment