देवनारच्या धुराचे ‘नासा’ने अंतराळातून टिपले फोटो

nasa
मुंबई : मुंबईत २७, २८ आणि २९ जानेवारीला सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरले होते. पहिल्यांदा धुके वाटत होते, पण मात्र प्रत्यक्षात धुके नसून धूर होता. मुंबईच्या ईशान्येला असणाऱ्या देवनार डंम्पिंग ग्राऊंडला आग लागली होती त्याचा हा धूर सर्वत्र पसरला होता. देवनार आणि चेंबूर परिसरात या आगीच्या धुराचा सर्वात जास्त त्रास झाला. येथील अनेक शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. अजूनही ही आग पूर्णपणे विझलेली नाही. पण, या आगीचा धूर मुंबई शहरातही पसरला होता.
nasa1
या आगीचे अंतराळातून आता अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने टिपलेले काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर आगीच्या आणि धुराच्या या भयंकर रुपाची कल्पना येते.

Leave a Comment