
नवी दिल्ली – मोटारसायकलची वाढती मागणी लक्षात घेऊन यामाहा मोटर्स इंडिया लिमिटेडने ऑटो एक्स्पो २०१६मध्ये आपली नवी ‘सिगनस रे झेड आर’ ही गाडी लॉंच केली आहे. युवा पिढीला डोळ्यासमोर ठेवून झेड आर बनवली गेली आहे. यात सेल्फ स्टार्ट, डिस्क ब्रेकसह ही गाडी १०३ किलोची आहे. ही गाडी कंपनीने चार रंगात उपलब्ध केली असून सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या गाडीची किंमत ५० ते ६० हजाराच्या दरम्यान असू शकते.
यामाहाने ऑटो एक्स्पोत लॉंच केली ‘सिगनस रे झेड आर’
काय आहेत ‘सिगनस रे झेड आर’चे फिचर्स – ११३ सीसी ब्लूकोर इंजिन, वजन १०३ किलो, ५ लीटर पेट्रोल टँक स्पेस, डिस्क ब्रेक, ६६ किलोमीटर प्रति लीटर मायलेज.
