मल्टीटास्किंग मेंदूसाठी घातक: संशोधकांचा इशारा

multitasking
वॉशिंग्टन: सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या आणि प्रचंड धावपळीच्या काळात ‘मल्टीटास्किंग’ हा एक परवलीचा शब्द बनला आहे. अनेकांना आपल्या ‘मल्टीटास्किंग’च्या क्षमतेचा अभिमान असतो. मात्र प्रत्यक्षात मानवी मेंदूची रचना ‘मल्टीटास्किंग’साठी नव्हे; तर ‘मोनोटास्किंग’साथी अनुकूल असल्याने ‘मल्टीटास्किंग’ हे मेंदूला हानिकारक आहे; असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

मानवी मेंदूला एकावेळी एकच काम करण्याची नैसर्गिक क्षमता मिळाली आहे. एका वेळी अनेक कामे करणे हे अनैसर्गिक असून त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते; असे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांना आढळून आले आहे.

छोटी छोटी कामे पुरा केल्याने आपल्या मेंदूमध्ये ‘डोपामाईन’ हे हार्मोन निर्माण होते. हे हार्मोन सुखद संवेदना निर्माण करते. त्यामुळे एसएमएस, ई मेल करणे, ट्विट करणे; अशी किरकोळ कामे केल्याने हे हार्मोन तात्कालिक सुख देत असले तरी प्रत्यक्षात आपण कोणतेही मोठे, महत्वाचे काम केलेले नसते; असे इन्स्टिट्यूटचे संशोधक अर्ल मिलर यांनी सांगितले.

मल्टीटास्किंगमुळे मेंदूची विचारांना सुसंगती देण्याची आणि नको असलेले विचार, माहिती काढून टाकण्याची क्षमता नष्ट होते. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि क्षमता कमी होते; असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment