औट घटकेच्या गुगल मालकाला ८ लाखांचे इनाम

sanmay
सर्च इंजिन गुगल वेबसाईटचा औंट घटकेसाठी म्हणजे १ मिनिटांसाठी मालक बनलेल्या गुजराथच्या सन्मय वेदला गुगलने ८ लाख रूपयांचे बक्षीस दिले आहे. वास्तविक त्याला गुगलकडून चार लाख रूपये इनाम दिले जाणार होते मात्र सन्मयने ही रक्कम आर्ट ऑफ लिव्हींगतर्फे चालविल्या जाणार्‍या शाळांना देणगी म्हणून देण्याची घोषणा केल्यानंतर त्याची बक्षीसाची रक्कम गुगलने दुप्पट केली असे समजते.

गतवर्षी सप्टेंबरमध्ये गुगल डॉट कॉम डोमेन नेम खरेदीसाठी उपलब्ध करून दिले गेले होते तेव्हा सन्मयने १२ डॉलर्समध्ये गुगल खरेदी केले व तो गुगल वेबसाईट टूल्सपर्यंत पोहोचला होता. १ मिनिटासाठी तो गुगलचा मालक बनला. गुगलने त्यांच्या सुरक्षा तपासणीसाठी ही स्पर्धा आयोजित केली होती व त्यासाठी ४ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

सन्मनने ही बक्षीस रक्कम लिकडेनवर देणगी म्हणून दिल्याचे जाहीर केले. आर्ट ऑफ लिव्हींगची शिक्षण शाखा १८ राज्यात ४०४ शाळा चालविते व तेथे विद्यार्थ्यांकडून फी घेतली जात नाही. गुगलच्या या स्पर्धेत ब्रिटन, पोलंड, जर्मनी, इस्त्रायल, रोमानिया, ब्राझील, अमेरिका, चीन, रशिया भारतासह जगातील अनेक देशांतील युजर सहभागी झाले होते.

Leave a Comment