रामदेवबाबांच्या पतंजलीला रामरहिम कंपनीची टक्कर

ram-rahim
देशातील दिग्गज एफएमसीजी कंपन्यांच्या नाकात दम आणणार्‍या रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला देशातच तगडी टक्कर देण्याची तयारी झाली आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिमबाबा त्यांच्या कंपनीची अनेक उत्पादने या महिन्यात भारतीय बाजारात आणत आहेत. हरियाणासह अनेक राज्यात त्यांची एमएसजी स्टोअर्स सुरू केली जात असल्याचे समजते.

चित्रपटात आपले नशीब आजमावल्यानंतर डेरा सच्चा प्रमुख रामरहिम आता घरगुती वापराच्या पदार्थांपासून ते इलेक्ट्राॅनिक व फर्निचर संदर्भातल्या अनेक वस्तू बाजारात विकणार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार बाजारात मिळत असलेल्या पदार्थात भेसळ मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यांच्या कंपनीची उत्पादने शुद्ध व नैसर्गिक पदार्थांपासून बनविली गेली आहेत. रामरहिम स्वतःच त्यांच्या कंपनीचे ब्रँड अँबेसिडर आहेत. व कंपनीच्या जाहिरातीही तयार झाल्या आहेत.

रामरहिम बाबांनी त्यांच्या कंपनीची स्पर्धा पतंजली आयुर्वेदशी नसल्याचे सांगितले असले तरी याच महिन्यात तेही संपूर्ण आटा नूडल्स बाजारात आणत आहेत व त्याचा थेट रोख पतंजली आटा नूडल्सकडेच असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment