नेफ्ट डासलेर – तेलावर वसलेले शहर

neft
अझरबैझानची राजधानी बैकू पासून १०० किमी वर असलेले नेफ्ट डासलेर हे शहर चक्क तेलावर वसलेले शहर आहे. येथे समुद्रात तेलावरच प्लॅटफॉर्म प्रमाणे स्ट्रकचर करून हे शहर वसविले गेले असून त्याची लोकसंख्या आहे ३ हजार. या शहराला लँड ऑफ फायर असेही म्हटले जाते. येथील नागरिकांना सर्व सुविधा दिल्या गेल्या आहेत.

या अतर्क्य शहराच्या उभारणीसाठी कांही वाया गेलेली जहाजे वापरून त्याचा पाया केला गेला. त्यानंतर ऑईल प्लॅटफॉमवर हे शहर उभारले गेले. अझरबैझान हा तेलसंपन्न देश असून त्यांच्याकडे संपत्तीही खूप आहे. १८७० सालापासून येथे तेलाचे उत्पादन घेतले जात असल्याचे इतिहास सांगतो. तर तिसर्यार चौथ्या शतकापासून येथे पेट्रोलियम पदार्थांचा व्यापार सुरू असल्याचे कांही जाणकार सांगतात. या प्रांतावर रशियाचा कब्जा होता. पहिल्या महायुद्धात येथून प्रचंड प्रमाणावर तेल उपसून ते विकले गेले होते.

Leave a Comment