‘मायक्रोसॉफ्ट’च्या महिला कर्मचाऱ्यांची ‘मॅटर्निटी लिव्ह’ दुप्पट

microsfot
नवी दिल्ली : आपल्या महिला कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्ट इंडियाने एक खुशखबर दिली असून आपल्या महिला कर्मचाऱ्यांची ‘मॅटर्निटी लिव्ह’ कंपनीने दुप्पट केली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे मायक्रोसॉफ्टच्या महिला कर्मचाऱ्यांना आता सहा महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह मिळणार आहे. शिवाय या महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत कामकाजात लवचिक व्यवस्थाही मिळणार आहे. याबाबत मायक्रोसॉफ्ट इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कार्यालयात स्वस्थ आणि उत्पादक वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान फ्लिपकार्टनेही आपल्या महिला कर्मचाऱ्यांची मॅटर्निटी लिव्ह वाढवली असून सोबतच अशा महिलांना पिक-अप आणि ड्रॉपची सुविधाही देण्यात आली आहे.

Leave a Comment