आता भारतात देखील मिळणार फोर्डची मस्टँग

ford
नवी दिल्ली: आपली मस्टँग कार भारतात अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी फोर्ड लाँच करणार असून सगळ्यात पहिले १९६४ मध्ये मस्टँग या कारला लाँच करण्यात आले होते. आपली सिडान मस्टँग कार यंदाच्या वर्षीच फोर्ड भारतात लाँच करायच्या तयारीट आहे. ही कार लवकरच होणाऱ्या ऑटो एक्सपो मध्येही शोकेस करण्यात येणार आहे.

फोर्डची ही मस्टँग कार पहिलीच २ डोर रियर व्हील ड्राईव्ह असलेली स्पोर्ट्स कार आहे. याआधी मस्टँग लेफ्ट हँड ड्राईव्ह फंक्शन सह उपलब्ध होती. या कारमध्ये ५.० लीटर व्ही ८ इंजिन लावण्यात आले आहे. याचबरोबर मस्टँगमध्ये नॉर्मल, स्पोर्ट+, ट्रॅक आणि वेट हे चार ड्रायव्हिंग मोड्स उपलब्ध आहेत. तसंच फोर्डच्या या गाडीत सिंक-३ इंफोटेनमेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक वायपर्स, स्टार्ट-स्टॉप बटण आणि एडॉप्टिव्ह क्रुज कंट्रोलही आहे. कंपनीने या कारच्या किमतीबाबत मात्र कोणताही खुलासा केलेला नाही.

Leave a Comment