३० हजार कूल पॅड नोट३ लाइटची अवघ्या २१ सेकंदात विक्री

coolpad
नवी दिल्ली : ग्राहकांची चायनीज स्मार्टफोन कंपनी असलेल्या कूल पॅड नोट३ लाइटला पसंतीची पावती मिळत असून कंपनीने अवघ्या २१ सेंकदात ३० हजार स्मार्टफोन विकले गेल्याचा दावा केला आहे. अॅमेझोनवर या फोनची विक्री होत असून हा स्मार्टफोन अवघ्या सहा हजार ९९९ रुपयांत मिळत आहे.

या कूलपॅड नोट ३ लाइटमध्ये पाच इंचाची स्क्रीन आहे. यात ६४ बिट १.३ गिगाहर्टझ मीडियाटेक क्वाड कोर प्रोसेसर आहे. यात ४ जीबी ऱॅम आहे. तसेच १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलाय. तर ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात बॅटरीची क्षमता २५००mAh, तसेच ५.१ लॉलीपॉप अँड्रॉईड देण्यात आले आहे.