हुवाईने लॉन्च केला ‘ऑनर ५एक्स’

huwai
मुंबई : भारतात चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी हुवाईने ऑनर ब्रँडचा आगामी स्मार्टफोन ‘ऑनर ५एक्स’ लॉन्च केला असून हुवाईच्या याआधीच्या ऑनर ४एक्सचा ऑनर ५एक्स हा स्मार्टफोन अपग्रेडेड व्हर्जन आहे. १ फेब्रुवारीपासून या स्मार्टफोनची विक्री अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरु केली जाणार आहे. आजपासून स्मार्टफोन खरेदीची नोंदणी सुरु होण्याची शक्यता असून ऑनर ५एक्स या स्मार्टफोनची १२ हजार ९९९ रुपये एवढी किंमत आहे.
यापर्वीच म्हणजे ऑक्टोबर २०१५मध्ये चीनच्या स्मार्टफोन बाजारात ऑनर ५एक्स लॉन्च करण्यात आला होता.

कसा आहे हुवाईचा ‘ऑनर ५एक्स : याचा एचडी डिस्प्ले ५ इंचाचा असून त्याचे रिझॉल्युशन १०८०×१९२० एवढे आहे. यात ६४-बिट ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६१६ चिपसेटचा प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर २ जीबीचे रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी तसेच मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबीपर्यंत वाढण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. यात १३ मेगापिक्सेलचा रिअर आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. याच्या बॅटरी क्षमता ३०००mAh एवढी आहे. त्याचबरोबर ब्लूटूथ, यूएसबी, जीपीएस, ए- जीपीएस, वाय-फाय, ४जी एलटीई कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Leave a Comment