
नवी दिल्ली – आता भारतीय बाजारपेठेवर सुप्रसिद्ध अॅप्पल कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने लक्ष केंद्रीत केले असून अॅप्पल कंपनीने ‘आयफोन’ची विक्री वाढविण्यासाठी भारतीय बाजारपेठेत रिनोव्हेट केलेले ‘आयफोन’ विकण्याची केंद्राकडे परवानगी मागितली आहे. यासोबतच भारतात चीनमध्ये वापरलेले गेलेले आयफोन्स आयात करून ते रिनोव्हेट करण्याचा कारखाना सुरू करण्याचाही कंपनीचा मानस आहे.
‘अॅप्पल’चे ‘आयफोन’ विकण्यासाठी केंद्राला साकडे
यापूर्वीही मागील वर्षी अॅप्पल कंपनीने १ लाख वापरलेले गेलेले आयफोन आणि अडीच लाख ‘आयपॅड्स’ रिनोव्हेट करून भारतात आयात करण्याची परवानगी मागितली होती. त्याला देशाच्या ई-कच-यात वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पर्यावरण मंत्रालयाच्या तांत्रिक पुनरावलोकन समितीने(टीआरसी) नकार दिला होता. रिनोव्हेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांच्या कार्यशीलतेचा कालावधी भरपूर कमी असतो आणि त्या त्वरित कालबाह्य होतात. त्याने देशातील ई-कच-यात वाढ होईल, असे मत ‘टीआरसी’ने नोंदवले होते.
दरम्यान, ‘टीआरसी’ने तीन वर्ष वापरलेले गेलेले आणि पुढील किमान पाच वर्षांपर्यंत वापरता येतील असे इलेक्ट्रॉनिक्स आयात करण्याची परवानगी देण्यास तयारी दर्शविली आहे.
