बाजारात उपलब्ध झाला लेनोव्हाचा वाइब एक्स ३

lenova
नवी दिल्ली- लेनोव्हाचा प्रिमियम स्मार्टफोन वाइब एक्स ३ नुकताच लाँच झाला असून अॅमेझोन इंडियावर लेनोव्हो वाइब एक्स ३ हा फ्लॅगशिप फोन विक्रीसाठी खुला झाला आहे. या फोनची किंमत आहे १९,९९९ रुपये.

लेनोव्होने याआधी के ४ नोट हा फोन बाजारात आला होता. त्या फोनप्रमाणेच या फोनमध्ये देखील व्ही. आर. थिएटर मॅक्स ही प्रणाली आहे. चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक चित्तथरारक होण्यासाठी ही प्रणाली अतिशय प्रभावी आहे. १०० अंश, थिएटर स्टाइल मोठ्या स्क्रीनचा अनुभव या प्रणालीतून मिळू शकरणार आहे. १२०० रुपयांमध्ये वेगळे हेडसेट्स यावर उपलब्ध आहेत. साडेपाच इंचाचा पूर्ण एचडी आयपीएस डिस्प्ले, ६४ बिट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर असलेल्या फोनला ३ जीबी रॅमची साथ आहे. स्टोरेज कॅपेसिटी ३२ जीबी असल्यामुळे फोन सतत हॅंग होण्याची कटकट देखील नाही. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा. २१ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा तुमची व्यक्तिगत फोटोग्राफी देखील व्यावसायिक फोटोग्राफीप्रमाणे सुंदर बनवू शकतो. स्मार्टफोनला साजेशी अशी ३,५०० एमएएच बॅटरी या फोनला आहे.

Leave a Comment