जेएलआरची एक्सजे सलून भारतात सादर

jaguar
टाटा मोटर्सच्या मालकीच्या जग्वार लँड रोव्हरची लक्झरी कार एक्सजे सलून भारतात गुरूवारी लाँच करण्यात आली. या कारच्या किमती ९८ लाखांपासून पुढे सुरू आहेत. तंत्रज्ञान, क्राफटसमनशिप आणि स्पोर्टिग व्हेईकल काँबिनेशनची ही कार म्हणजे सौंदर्य व ताकदीचा उत्तम नमुना असल्याचे सांगितले जात आहे. या कारचे उत्पादन पुण्यात केले गेले आहे.

जेएलआर इंडियाचे अध्यक्ष रोहित सूरी यावेळी बोलताना म्हणाले, सलूनचे वर्ल्ड क्लास इंटिरिअर, दमदार इंजिन आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रवासाचा अनोखा अनुभव देईलच पण चालकासाठीही ही कार चालविणे आनंददायी आणि आरामदायी असेल. पेट्रोल मॉडेलची किंमत ९९.३ लाख रूपये आहे तर डिझेल ९८.०३ पासून १ कोटी ५ लाख रूपयांपर्यंत उपलब्ध आहे. देशभरातील २३ वितरकांच्या माध्यमातून या कारची विक्री सुरू केली गेली आहे.

Leave a Comment