अॅडव्हान्स प्राप्तीकर भरण्यात सलमानची आघाडी

akshay
अॅडव्हान्स प्राप्तीकर भरण्यात यंदा बॉलीवूड अभिनेता सलमानखानने अक्षयकुमारला मागे टाकले आहे. मुंबई आयकर विभागातील वरीष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या प्राप्तीकरापोटी सलमानखानने २० कोटी रूपये भरले आहेत तर अक्षयकुमारने १६ कोटी रूपये भरले आहेत. त्या पाठोपाठ रणबीरने १५, शाहरूखने १४ तर अमिताभ बच्चन यांनी ८ कोटी ७५ लाख रूपये भरले आहेत.

मुंबई आयकर विभागाने तिसर्‍या तिमाहीचा डेटा नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यात अॅडव्हान्स कर भरणा करणार्‍यांतील टॉप करदात्यांमध्ये उद्योजक आशुतोष तापडीया हे प्रथम क्रमांकावर असून त्यांनी ७५ कोटी रूपये अॅडव्हान्स कर भरला आहे. त्यापाठोपाठ आणखी तीन तापडीयाच आहेत. संजीवकुमार तापडीया यांनी ६३ कोटी, अरूणादेवी तापडीया यांनी ३७ कोटी तर अंजली आशुतोष तापडीया यांनी ३६ कोटी रूपये अॅडव्हान्स कर भरला आहे.