झिका विषाणूचे अमेरिकेत थैमान

zika
सान जुआन : पोर्तोरिकोमध्ये झिका विषाणूचा प्रादुर्भाव झालेले १९ रुग्ण सापडले असून युरोपातील काही पर्यटकांमध्येही हा विषाणू असल्याचे दिसून आल्यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. झिका विषाणू एडिस एजिप्ती डासामुळे पसरतो. या डासामुळे डेंग्यू व चिकुनगुन्याही होतो. झिका विषाणू असलेला डास जर गर्भवती महिलेला चावला तर जन्माला येणा-या मुलाचा मेंदू विकसित होण्यास अडथळा निर्माण होतो.

सध्या बाधा झालेल्यांत एकाही गर्भवती महिलेचा समावेश नसला तरी ब्राझीलमध्ये या विषाणूने धुमाकूळ घातल्याचे वृत्त आहे. अमेरिकेनेदेखील दक्षिण अमेरिका व कॅरेबियन देशांत प्रवास न करण्याचा इशारा आपल्या नागरिकांना दिला आहे. ज्यांनी या देशांत प्रवास करण्यासाठी विमानतिकिटे काढली होती, त्यांना पैसे परत दिले जात आहेत. या रोगाची लक्षणे स्पष्टपणे दिसत नाहीत. काही वेळा ताप व पुरळ अशी लक्षणे दिसतात. पण, बहुतांश रोग झाल्यावरच या विषाणूची लागण झाल्याचे समजते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment