फेसबुकवर लवकरच ६ सिंबॉल येणार

facebook
जगातील सर्वात मोठी सोशल साईट फेसबुक त्यांच्या १०.६ कोटी युजर्ससाठी नवीन इमोशनल सिंबॉल आणत असल्याची घोषणा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने केली आहे. या सिंबॉलसाठीच्या चाचण्या अमेरिकेबाहेर चार महिने केल्या जात असून लवकरच हे सिंबॉल साईटवर येतील. या सिंबॉलच्या सहाय्याने युजर केवळ लाईक डिसलाईक करण्याशिवाय राग, दुःख, वा, क्या बात है!, हाहा, या, लव्ह या वेगळ्या प्रतिक्रियाही नोंदवू शकतील.

या सिंबॉलसाठीच्या चाचण्या चिली, फिलिपिन्स, पोर्तुगाल, आयर्लंड, स्पेन, जपान व कोलंबियात केल्या गेल्या आहेत. यामुळे फेसबुकच्या थम्सअप सिंबॉल शिवाय आणखी सहा नवे सिंबॉल युजरला दिसतील. नवीन पोस्ट, कमेंट, फोटो, व्हिडीओ वर युजर त्याच्या मदतीने रिअॅक्शन देऊ शकेल. झुकेरबर्ग या संदर्भात माहिती देताना म्हणाला आमच्या युजरने त्याच्या सगळ्या भावना व्यक्त कराव्यात, शेअर कराव्यात असा आमचा प्रयत्न आहे. युजरला जितके जादा ऑप्शन मिळतील तितके त्याची शेअरिंगची क्षमता वाढेल असेही तो म्हणाला.

Leave a Comment