ह्युंदाईची मस्त आय ३०

hyundai
ह्युंदाईच्या आय टेन व ट्वेंटी गाड्यांनी भारतात चांगलीच लोकप्रियता व ग्राहकांची पसंती मिळविली आहे. मात्र ह्युंदाईची अशीच जबरदस्त आय थर्टी ही कार मात्र अद्यापी भारताच्या बाजारात दाखल झालेली नाही. ही कार युरोपियन मार्केटमध्ये विकली जात असून तिची तीन व्हेरिएंटस आहेत. आय थर्टी, आय थर्टी वॅगन व आय थर्टी थ्री डोअर अशा नावाने ही मॉडेल्स विकली जात आहत.

ही तीनही मॉडेल्स आय ट्वेंटीपेक्षाही आकाराने थोडी मोठी आणि दणकट आहेत. या तीनही मॉडेल्ससाठी दिली गेलेली फिचर्स बहुतेक सारखीच आहेत मात्र आय थर्टी थ्री डोअरला तीनच दरवाजे आहेत. आय थर्टी ही आयथर्टी वॅगनपेक्षा थोडी लहान आहे. तीनही मॉडेल्समध्ये अंतर्गत स्पेस प्रशस्त आहे आणि त्यांना अत्याधुनिक फिचर्सची जोड दिली गेली आहे. ६ स्पीड मॅन्युअल व ६ स्पीड ऑटो ट्रान्समिशन बरोबरच हायर व्हेरिएंटसाठी ७ स्पीड ट्रान्समिशन ऑप्शनही दिले गेले आहे. टॉप व्हेरिएंटचा कमाल वेग ताशी २०० किमी पर्यंत आहे असेही समजते.

Leave a Comment