झाकीस्तानात जाण्यासाठी हवा पासपोर्ट

zakistan
रिपब्लीक ऑफ झाकिस्तानात जाण्याचा तुमचा विचार असेल तर तुमचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा झाकिस्तान नावाचा देश नक्की आहे कुठे? तर त्याचे उत्तर आहे हा देश अमेरिकेतील उटाजवळ आहे. हा वाळवंटी भाग आहे. खरी मजेची माहिती तर पुढेच आहे.

अमेरिकेतील जॅक लँडसबर्ग नावाच्या एका व्यक्तीने या देशाची स्थापना केली आहे. तो स्वतःला या देशाचा राष्ट्रपती म्हणवितो आणि त्याने देशाचा पासपोर्टही जारी केला आहे. मात्र या देशाला जगातील कोणत्याच देशाने अद्यापी मान्यता दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार जॅकने या वाळवंटातील चार एकर जमीन १५ वर्षांपूर्वी ऑनलाईन खरेदी केली व तेथे स्वतंत्र देशाची स्थापना केली आहे. या देशापासून सर्वात जवळचे शहर ९६ किमी दूर आहे तर रस्त्यावर येण्यासाठी २४ किमीचे अंतर कापावे लागते. देशाच्या सुरक्षेसाठी रोबो गार्ड आहेत. देशात प्रवेश करताना पासपोर्टवर शिक्का मारण्याचीही सोय आहे. समथिंग फ्रॉम नथिंग हे या देशाचे ब्रीदवाक्य आहे.

विशेष म्हणजे स्वतःला राष्ट्रपती म्हणवून घेणारा जॅक स्वतः येथे रहात नाही तर १-२ वर्षातून कधीतरी येथे चक्कर मारतो. मित्रांसोबतही तो येथे येतो व त्याच्या मित्रांना हा देश आवडला आहे असेही समजते.

Leave a Comment