शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी आकाशवाणीचे अॅप आधारित चॅनल

all-india
नवी दिल्ली – आकाशवाणीने आज एक अॅप आधारित श्राव्य चॅनल सुरु केले असून जे शास्त्रीय संगीत प्रेमींना त्यांच्या आवडीचे संगीत ऐकवणार आहे. रागम असे या चॅनलचे नाव असून ज्याचे लोकार्पण प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष सूर्य प्रकाश यांच्या हस्ते केले गेले. याचबरोबर देशभरात १३ अन्य केंद्रावरून यांचे नियमित सॉफ्टवेअर अपडेट देखील मिळणार आहेत.

याबाबत प्रसार भारतीकडून मिळालेल्या माहितीनुसार रागम हे चॅनल २४ तास सुरु राहणार आहे आणि आजपासून अँड्रॉईड, आयओएस, विंडोज वर उपलब्ध अॅिप्केशन ऑल इंडिया रेडिओ लाइव म्हणून डाउनलोड केले जाऊ शकते.

Leave a Comment