अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखराला भारतीय महिलेची गवसणी

aparna-kumar
लखनऊ : अंटार्क्टिका उपखंडावरील सर्वोच्च शिखर माऊंट विंन्सन मॅसिफ उत्तर प्रदेशातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याने पादाक्रांत केले असून या महिला आयपीएस अधिकाऱ्याचे नाव अपर्णा कुमार असे आहे.

हे शिखर १७ जानेवारी रोजी अपर्णा यांनी पादाक्रांत केले. या शिखराची उंची समुद्रसपाटी पासून १७,००० फूट इतकी आहे. अपर्णा यांनी शिखराच्या माथ्यावर पोहोचताच भारताचा तिरंगा फडकवला. त्याचसोबत त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांचाही झेंडा फडकवला. भारतातील नागरी सेवा विभागातील अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.

Leave a Comment