हुवाई फ्लॅगशीप फोन पी ९ चार व्हेरिएंटमध्ये आणणार

huawei
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी हुवाई त्यांचा फ्लॅगशीप स्मार्टफोन पी ९ चार व्हेरिएंटमध्ये सादर करणार असून तो साधारण पुढच्या महिन्यात बार्सिलोना येथे होत असलेल्या वर्ल्ड मोबाईल काँग्रेसच्या सुमारास सादर केला जाईल असे समजते. कंपनी वर्ल्ड काँग्रेसनंतर त्यासाठी स्वतंत्र इव्हेंटही करणार आहे. याच कार्यक्रमात कंपनी त्यांचे सरफेस बुक व लॅपटॉप लाँच करण्याचीही शक्वयता वर्तविली जात आहे.

पी नाईनची लाईफ (स्मॉल स्क्रीन), मॅक्स (मोठा स्क्रीन), अँडव्हान्स व्हेरिएंट यावेळी सादर केली जातील. अॅडव्हान्स व्हेरिएंटसाठी ड्युएल सिम, १२ एमपीचा ड्यु्रएल कॅमेरा, स्टँडर्ड व्हेरिएंटपेक्षा अधिक क्षमतेचे रॅम व स्क्रीन त्याला दिले जातील असे संकेत दिले गेले आहेत.

Leave a Comment